एआय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे दीड हजार चालकांवर कारवाइ

0
2

राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने मागील सहा दिवसांत मेरशी-पणजी आणि पर्वरी भागातील आर्टिफिशअल इंटेलिजन्स ट्राफिक मॅनेजमेंट स्टिस्टम आधारित सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या सुमारे दीड हजारापेक्षा जास्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
वाहतूक खात्याने सीसीटीव्हींच्या माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात गेल्या 1 जूनपासून कारवाईच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसात सुमारे 1 हजार 717 जणांना वाहतूक नियमभंग प्रकरणी दंडाचे चलन जारी केले आहे. वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर दंडाचे चलन पाठविले आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी चारशेच्यावर वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे टिपले होते.