उत्तराखंडमधील कारागृहात 44 कैदी एचआयव्ही बाधित

0
10

उत्तराखंडमधील हल्दवानी येथील कारागृहातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेने हल्द्वानी कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून या सर्व कैद्यांवर हल्दवानी येथील सुशीला तिवारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. हल्दवानी कारागृहात एचआयव्ही बाधित कैद्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी, तुरुंगात आढळून आलेले एचआयव्ही बाधित कैदी हे ड्रग्जचे व्यसनी असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत हल्दवानी कारागृहात 1629 पुरुष आणि 70 महिला कैदी आहेत. यातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित कैदी आढळल्याने कारागृह प्रशासने कैद्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.