Home Featured इराण युद्ध : मोदींचीमॅक्रॉन यांच्याशी चर्चा

इराण युद्ध : मोदींचीमॅक्रॉन यांच्याशी चर्चा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पश्चिम आशियातील संघर्ष निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीची तातडीने गरज दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या संवादाची माहिती दिली. पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स जवळून काम करत राहतील आणि समन्वय साधतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मॅक्रॉन यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशीही संवाद साधला. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भातील प्रश्नांची चर्चा यावेळी करण्यात आली.