इराणमधील भारतीयांना वास्कोत ठेवण्यास विरोध

0
243

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने गोव्यात आणून हार्बर मुरगाव येथे एमपीटीतर्फे तयार केलेल्या कॉरीएन्टल केंद्र सेंटरमध्ये आणून ठेवणार असल्याच्या धास्तीने सडावासीय एकवटले व वास्को येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात धडक घेऊ असे केंद्र मुरगावात नको असल्याची मागणी केली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने आणून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर मुरगाव हार्बर येथे एमपीटीतर्फे आपल्या जुन्या प्रधान कार्यालयातील पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर उघडलेल्या कॉरीएन्टल सेंन्टरमध्ये ठेवण्याच्या हालचाली होत असल्याची बातमी धडकली.
दरम्यान, मुरगाव हार्बर येथे कॉरीएन्टल केंद्र होणार या भीतीपोटी सारे सडावासीय उपजिल्हाधिकारी फळदेसाई यांना भेटले. त्यांचयाकडून या संदर्भात लेखी आश्‍वासन घेतल्यानंतरच हे नागरिक तेथून निघून गेले.