Home Featured इराणकडून आखाती देशांतील गॅस प्रकल्पांवर हल्ले

इराणकडून आखाती देशांतील गॅस प्रकल्पांवर हल्ले

0

इस्रायलने बुधवारी दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. साउथ पार्स हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र मानले जाते. यानंतर इराणने आखाती देशांतील ऊर्जा आणि गॅस प्रकल्पाची राख करू असा इशारा दिला होता. यानंतर हा इशारा सत्यात उतरवत बुधवारी रात्री इराणने ऊर्जा व गॅस प्रकल्पांवर क्षेपणास्त्र हल्ला केले. पहिल्यांदा कतारमधील रास लाफान इंडस्ट्रियल सिटी गॅस क्षेत्राला लक्ष्य केले. त्यानंतर मिना अल-अहमदी रिफायनरी कुवेत, मिना अब्दुल्ला रिफायनरी कुवेत, हबशान गॅस सुविधा आणि बाब ऑईलफिल्ड यूएई आणि सामरेफ रिफायनरी सौदी अरेबिया या ठिकाणी इराणने हल्ले केले.

इराणमधील साउथ पार्स गॅस क्षेत्र हे जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक आहे. इरानच्या 70 टक्के घरगुती गॅस पुरवठ्याचा स्रोत हेच आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी मोठी आग लागल्याची पुष्टी झाली आहे. या हल्ल्यात गॅससोबतच पेट्रोकेमिकल आणि तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. इस्रायली माध्यमांनी बुशेहर प्रदेशातील एका गॅस सुविधेवर हल्ला झाल्याचेही वृत्त दिले आहे.