इमारतीवरून पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

0
6

सांकवाळ येथे काल एका इमारतीच्या गच्चीवरून खाली पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकवाळ येथे एमवीर कन्स्ट्रक्शनच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील गच्चीवरून खाली पडून इमारतीचा सुरक्षारक्षक राजू मांजे याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास तो जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. इमारतीच्या रहिवाशांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजू मांजे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिला.