आरोग्य सर्वेक्षणात ४.३९ लाख नागरिकांच्या नोंदी ः मुख्यमंत्री

0
153

राज्यातील तीन दिवसांच्या सामुदायिक आरोग्य सर्वेक्षणात ४ लाख ३९ हजार ६६६ एवढ्या नोंदी झाल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वेक्षणाला सहकार्य केलेल्या नागरिकांचे आभार मानले. राज्यातील कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईला बळकटी देण्यासाठी हे आरोग्य सर्वेक्षण लाभदायक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्ती केली.

कोविंड-१९ च्या पार्श्‍वभूमीवरील राज्यातील नागरिकांच्या आरोग्य परिस्थिची आढावा घेण्यासाठी  राज्य सरकारने घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी या आरोग्य सर्वेक्षणाला आक्षेप घेतला होता. राज्यातील १२ तालुक्यांतून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. सुमारे ५७४ गावे, शहरातील ४ हजार प्रभागातून सर्वेक्षण करण्यात आले आहे.  या सर्वेक्षणात ६ हजार ७०० सर्वेक्षकांनी सहभाग घेतला. त्यात शिक्षक, अंगणवाडी सेविका, बीएलओ, मामलेदार कार्यालयातील कर्मचारी व इतरांचा समावेश होता.