आयोगाकडून आरक्षणासंबंधी सुधारित अधिसूचना जारी

0
13

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या महिला, ओबीसी, एससी आणि एसटी प्रभाग आरक्षणासंबंधी सुधारित अधिसूचना काल जारी केली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १० ऑगस्ट २०२२ रोजी घेतली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाबाबत गेल्या १ जुलै २०२२ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्या अधिसूचनेमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. आता, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित अधिसूचनेमध्ये ओबीसी घटकाला आरक्षण देण्यात आले आहे. पंचायत खात्याने ओबीसीमध्ये १९ घटकांचा समावेश केला आहे. राज्य सरकारने गेल्या ६ जुलै २०२२ रोजी मागासवर्गीय आयोगाने ओबीसी प्रभाग आरक्षणासंबंधी तयार केलेला अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. सदर अहवाल विचारात घेऊन ओबीसी घटकाना आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेईश मागुशसाठी आरक्षण जाहीर
बार्देश तालुक्यातील रेईश मागूश ग्रामपंचायतीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या पंचायतीमध्ये प्रभाग ङ्गेररचनेबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. या तक्रारीबाबत चौकशी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर आयोगाने प्रभाग आरक्षणाची अधिसूचना जारी केली.