आयुष्मान भारत योजनेत घोटाळा

0
27

लोकसभेत सादर केलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या लेखापरीक्षणाच्या अहवालात कॅगने अनेक धक्कादायक खुलासे केले असून, त्यातून या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.
कॅगच्या या अहवालानुसार, जवळपास 7.5 लाख लाभार्थ्यांनी एकाच मोबाईल नंबरवरून नोंदणी केल्याचे समोर आले आहे. हा मोबाईल क्रमांक 9999999999 असा आहे. हा मोबाईल क्रमांकही चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे सुमारे 1 लाख 39 हजार 300 लोकांनी 8888888888 या क्रमांवरुन नोंदणी केली आहे, तर 96,046 लोकांनी 90000000 या क्रमांकावरुन नोंदणी केली आहे, असे कॅगच्या अहवालात नमूद केले आहे.