24 C
Panjim
Friday, November 27, 2020

आयपीएलवर सट्टेबाजी करणारी आठवी टोळी गोव्यात पकडली

>> हडफडे येथील छाप्यात तिघांना अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने हडफडे – बार्देश येथील ग्रीन व्हिलावर रविवारी रात्री छापा मारून आयपीएल बेटिंग घेणार्‍या आणखी एका टोळीचा पर्दाफाश करीत तीन जणांना अटक केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या आखाती देशात सुरू असलेल्या या मोसमातील सामन्यांच्या वेळी या टोळीने आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांचे बेटिंग स्वीकारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

शक्ती पंजाबी, विशाल आहुजा आणि हितेश केसवानी अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून सर्वजण गांधीधाम – गुजरात येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल संच आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही टोळी ग्राहकांकडून मोबाईलच्या माध्यमातून बेटिंग स्वीकारत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी राज्यात आयपीएल बेटिंग घेणार्‍या आठ टोळ्यांचा आजवर पर्दाफाश केला आहे. आयपीएल बेटिंग प्रकरणात अटक केलेले सर्वजण परराज्यातील रहिवाशी आहेत. हॉटेल किंवा फ्लॅट भाडेपट्टीवर घेऊन आयपीएल बेटिंग करणार्‍या टोळ्या ऑनलाइन वा मोबाईल ऍपद्वारे बेटिंग स्वीकारत असल्याचे उघड झाले आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर, उपनिरीक्षक नितीन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा मारला.
कळंगुट पोलिसांनी आयपीएल बेटिंग घेणार्‍या चार टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे, तर गुन्हा अन्वेषण विभागाने आतापर्यंत तीन टोळ्यांचा छडा लावला आहे. पर्वरी पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION