राज्य सरकारने आयएएस अधिकारी संजीत रॉड्रिगीस यांची अखेर राज्य सरकारच्या सेवेतून मुक्तता केली आहे.
केंद्रीय मंत्रालयाने आयएएस अधिकारी संजीत रॉड्रिगीस यांची लडाख येथे सप्टेंबर 2024 मध्ये बदली केली होती; मात्र ते गेले कित्येक महिने गोवा सरकारच्या सेवेतच कार्यरत होते. केंद्रीय मंत्रालयाने त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यानंतर त्यांना राज्य सरकारच्या सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, अंदमान निकोबार येथे बदली करण्यात आलेले आणखी एक आयएएस अधिकारी प्रसाद लोलयेकर यांना अद्यापर्यंत राज्य सरकारच्या सेवेतून मुक्त करण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्रालयाने प्रसाद लोलयेकर यांनाही बदलीच्या ठिकाणी त्वरित रुजू न झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे. लोलयेकर यांच्या बदलीचा आदेश सप्टेंबर 2024 मध्ये काढण्यात आला होता.
नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्य सरकारच्या सेवेत दाखल झालेले आयएएस अधिकारी संजीव गडकर यांची शिष्टाचार सचिवपदी आणि यतिंद्र मराळकर यांची सहकार सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश कार्मिक विभागाकडून जारी करण्यात
आला आहे.