आमदार आरोलकरांना न्यायालयाचा धक्का

0
10

धारगळ, पेडणे येथे आपण जमीन घोटाळा केल्याप्रकरणी आपणावर जो एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घेण्यात यावा अशी मागणी करणारी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दाखल केलेली याचिका काल उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

जीत आरोलकर यांनी धारगळ, पेडणे येथे 1.48 लाख चौ. मी. एवढ्या जमिनीचा घोटाळा करून सदर जमीन आपल्या नावावर करून घेतली असल्याची तक्रार ॲड्. आयरिश रॉड्रिग्ज यांनी विशेष जमीन घोटाळा तपास पथकाकडे केली होती. सदर जमिनीचे एक सहमालक रवळू खलप (मूळ म्हापसा) या अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीची जमीन हडप केल्याप्रकरणी ॲड्. रॉड्रिग्ज यांनी आपल्या अशिलाच्यावतीने जीत आरोलकर यांच्याविरूद्ध ही तक्रार केलेली आहे.

20 रोजी आयोगाकडे सुनावणी
यासंबंधीची पुढील सुनावणी आता जमीन घोटाळा प्रकरणाची तपासणी करणाऱ्या न्यायमूर्ती माधव आयोगापुढे येत्या 20 रोजी होणार आहे. जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सरकारकडे जमीन घोटाळा प्रकरणाची बाजू लढवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.