आमदार अपात्रता याचिका प्रकरणी 5 एप्रिलला सुनावणी

0
15

काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी दाखल याचिकांवर 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी काल स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल याचिकेवर उत्तर सादर करण्यासाठी आम्ही न्यायालयाकडे 6 आठवड्यांची मुदत मागितली होती. न्यायालयाने आम्हाला 6 आठवड्यांची मुदत दिली असून आता ही सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे, असे या आठ आमदारांपैकी एका आमदाराचे वकील ॲड. अभिजीत कामत यांनी सांगितले. काँग्रेसच्या आठ आमदारांनी गेल्या सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला

होता. दरम्यान, मडगावचे आमदार दिगंबर कामत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना पक्षविरोधी कारवायांसाठी अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या याचिकेवरील सुनावणी 6 मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. प्रतिवादींचे वकील काल न्यायालयात हजर न राहू शकल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली; मात्र वकिलांनी त्यांची उत्तरे न्यायालयात पाठवून दिली, असे काँग्रेस पक्षाचे वकील ॲड. अभिजीत गोसावी यांनी स्पष्ट केले.