आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन

0
17

>> नवीन संसद वास्तूवर फडकला तिरंगा

आज सोमवार दि. 18 पासून नव्या संसद भवनात विशेष अधिवेशन पार पडणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणारे विशेष अधिवेशन नवीन इमारतीत होणार आहे. नवीन संसदेत होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. रविवारी संसदेच्या नवीन इमारतीवर पहिल्यांदाच तिरंगा फडकवण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पोहोचले नाहीत.

संसदेचे कर्मचारी नवीन संसद भवनात जाताना नवीन पोशाख परिधान करतील. नेहरू जॅकेट आणि खाकी रंगाची पँट या ड्रेसमध्ये समाविष्ट आहे. लोकसभा सचिवालयानुसार, नोकरशहा बंद नेक सूटऐवजी किरमिजी किंवा गडद गुलाबी नेहरू जॅकेट घालतील.

नवीन संसद 13-14 ऑक्टोबर रोजी जी-20 देशांतील स्पीकर्सचे आयोजन करेल. संसद-20 ची बैठक येथे होणार आहे. निमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्षही सहभागी होणार आहेत.
या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्यात करण्यात आले होते. काल रविवारी नव्या संसदेच्या वास्तूवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत नवीन संसदेच्या वास्तूवर तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, मंत्री पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारी उपस्थित होते.

दालनांचे वाटप
मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीची यादीदेखील जारी करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे दालन तळमजल्यावर असणार आहे. त्याचप्रमाणे इतरही दालनांचे वाटप करण्यात आले आहे.

18 सप्टेंबरपासून जुन्या इमारतीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी रविवारी धनखड संसदेच्या नवीन इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवला. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हलवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाज सुरू होणार आहे. विशेष अधिवेशनाच्या उर्वरित 4 दिवसांचे कामकाजही तेथेच होईल.