आंध्र प्रदेशात गॅस गळती; ५० जणांची प्रकृती गंभीर

0
19

आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील एका कंपनीत गॅस गळती झाली असून, घटनेनंतर ५० लोकांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनकापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम येथील एका केमिकल कंपनीत ही गॅस गळती झाली. प्रकृती गंभीर बनलेल्या ५० जणांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. आंध्रचे उद्योगमंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी या घटनेबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच पीडितांना चांगले उपचार मिळावेत यासाठी पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.