अशांतता पसरवल्यास योग्य प्रत्त्युत्तर ः राष्ट्रपती

0
377

जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल असा कठोर संदेश चीनचे नाव न घेता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला. यावर्षी कोरोना महामारीमुळे दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीने साजरा केला जाणार नसल्याचे राष्ट्रपती म्हणाले. यावेळी कोरोनांदर्भात राष्ट्रपतींनी विचार मांडले. राष्ट्रपतींनी, केवळ दहा दिवसांपूर्वीच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ झाला आणि ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.