अमेरिकेत गोळीबाराच्या 3 घटना; 11 जणांचा मृत्यू

0
11

मेरिकेत गेल्या 24 तासांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या असून, त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांसह 11 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला होता.
सोमवारी दुपारी सॅन फ्रान्सिस्कोत एका इसमाने गोळीबार केला. या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. ‘हाफ मून बे’ मध्ये ही गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी 67 वर्षीय चुनली झाओ या संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका घटनेत आयोवामध्ये विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील मुलांवर एका हल्लेखोराने गोळीबार केला. त्यात 2 विद्यार्थी ठार झाले, तर 3 जण गंभीर जखमी झाले. शाळेत एक कार्यक्रम सुरू असतानाच हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये तीन संशयितांना अटक करण्यात आली, तर एक जण अद्यापही फरार आहे.
शिकागोमध्ये गोळीबाराची तिसरी घटना घडली. त्यात दोघा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.