अमित पाटकर यांचे सभापतींना स्मरणपत्र

0
7

काँग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध आपण दाखल केलेल्या व सध्या प्रलंबित असलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेऊन निवाडा द्यावा, अशी मागणी करणारे आणखी एक स्मरणपत्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांना पाठवले आहे. या अपात्रता याचिकेवर विनाविलंब सुनावणी न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही पाटकर यांनी तवडकर यांना दिला आहे.

2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या आठ पक्षबदलू आमदारांविरुध्द अमित पाटकर यांनी दाखल केलेली एक याचिका सभापतींसमोर प्रलंबित आहे. सभापतींनी अद्याप या प्रकरणी सुनावणी सुरू केलेली नाही.
आपल्या स्मरणपत्रातून अमित पाटकर यांनी परत एकदा सभापतींकडे लवकरात लवकर सुनावणी घेऊन याचिकेवर निकाल देण्याची मागणी केली आहे.