अमली पदार्थप्रकरणी गिरीतील छाप्यात 21 लाखांचे ड्रग्ज जप्त

0
4

एका केरळीयन नागरिकास अटक

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने गिरी म्हापसा येथे छापा घालून केरळमधील एका नागरिकाला अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 21 लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सेरीन सागीर (27 वर्षे, केरळ) असे आहे. त्याच्याकडून 21.20 ग्रॅम एलएसडी आणि 50 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. संशयित सेरीन हा व्यवसायाने चित्रकार असून मागील चार वर्षांपासून तो गोव्यात वास्तव्य करीत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पणजीत 1.10 लाखांचे अमली पदार्थ जप्त

दरम्यान, पणजी पोलिसांनी जुन्या सचिवालयाजवळ छापा टाकून 1.10 लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. या प्रकरणी हैदराबाद येथील महेंदर राजेंद्र सिंग (35 वर्षे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 1108 ग्रॅमचे अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. हैदराबाद पोलिसांनी संशयित महेंद्र सिंग याला अमलीपदार्थ प्रकरणी यापूर्वी अटक केलेली आहे. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.