अग्निपथ’योजनेंतर्गत गोव्यासाठी कोल्हापूरमध्ये नोव्हेंबरात भरती

0
20

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत गोवा आणि महाराष्ट्रातील युवकांची भरती करण्यासाठी कोल्हापूर आर्मी भरती कार्यालयामार्फत २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या क्रीडा मैदानावर भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.

गोव्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी ही भरती आहे. इच्छुकांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज ५ ऑगस्टपासून वेबसाइटवर उपलब्ध झाले असून ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अग्निवीर सामान्य सेवा, तांत्रिक कर्मचारी, लिपिक, भांडार व्यवस्थापक, अग्निवीर कुशल कारागीर आदी पदांसाठी भरती होणार आहे.