Home बातम्या मांडवी पुलावरीलअपघातात तरुण ठार

मांडवी पुलावरीलअपघातात तरुण ठार

0

नवीन मांडवी पुलावर काल कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 35 वर्षीय तरुण ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील नवीन मांडवी पुलावर इनोव्हा कार आणि ट्रायम्फ मोटारसायकल (क्र. जीए-03-बीडी-0052) या वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दुचाकीचालक सागर सुभाष पालयेकर (35, रा. पुंडलिकनगर, पर्वरी) याचा जागीच मृत्यू झाला. कारचालक निलेश विखार (रा. मावळ, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचा पंचनामा हवालदार श्रीपाद तेली यांनी केला असून, मृतदेह गोमेकॉमध्ये शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे.