शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सचिव (पीए) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. भवानीपूर या मतदारसंघात शुभेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींचा पराभव केला. त्यांच्या विजयात चंद्रनाथ रथ यांचा सिंहाचा वाटा होता. चंद्रनाथ रथ हे रणनीतीकार म्हणूनही ओळखले जात होते. निवडणूक निकाल लागल्यानंतर पुढच्या 48 तासांत हत्या करण्यात आली.