Home बातम्या डिचोली तालुक्यात घरगुतीसिलेंडरचा तुटवडा नाही

डिचोली तालुक्यात घरगुतीसिलेंडरचा तुटवडा नाही

0

जगात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस व इंधन टंचाईबाबत चर्चा होत असली तरी डिचोली तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही, असे डिचोली येथील गॅस वितरक सिद्धार्थ कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातच नव्हे तर देशभर गॅस पुरवठा सरकारच्या पूर्ण नियंत्रणात आहे. नागरी पुरवठा खात्याद्वारे सकाळ-संध्याकाळ परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे सध्या गॅसचे वितरण सुरळीत सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले. गॅस बुकिंगची सुविधा 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्राहकांना गॅस कमी पडण्याची शक्यता नाही आणि नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीत काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, हे त्यांनी मान्य केले.