Home Featured युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी रशिया-युक्रेनची सहमती

युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी रशिया-युक्रेनची सहमती

0

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धात आता दोन्ही देशांनी पुन्हा एकदा युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी सहमती दर्शवली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी काल रविवारी याबाबत माहिती देताना, सुमारे 1,200 युक्रेनियन कैद्यांची सुटका करण्यासाठी अदलाबदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे काम सुरू आहे. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर युद्धकैद्यांच्या अदलाबदलीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला. अनेक महिने रशियन तुरुंगांत कैद असलेल्या युक्रेनियन सैनिकांना व नागरिकांना परत आणण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुर्की आणि यूएईची मध्यस्थी युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख रुसतम उमेरोव यांनी तुर्की आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी अदलाबदलीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. तुर्कीच्या मध्यस्थीमुळे 1,200 युक्रेनियन कैद्यांची सुटका करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. रशियाने मात्रव याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी, आम्ही विचार करत असल्याचे म्हटले आहे. जून 2022 पासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त युक्रेनियन सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत,
ओडेसा प्रांतात रशियाचा हल्ला
युक्रेनच्या दक्षिण ओडेसा प्रांतात रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू तसेच 17 जण जखमी झाल्याची माहिती आहे.