Home बातम्या राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

0

शिल्पकार राम सुतार यांना काल ‘महाराष्ट्र भूषण 2024′ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण समारंभ नोएडा, उत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला. राम सुतार हे 100 वर्षांचे असून, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते मुंबईला येऊ शकत नसल्याने त्यांच्या निवासस्थानीच पुरस्कार वितरण झाले.