Home बातम्या गोव्यात बेकायदा आलेले कर्नाटकचे ट्रॉलर्स ताब्यात

गोव्यात बेकायदा आलेले कर्नाटकचे ट्रॉलर्स ताब्यात

0

गोव्याचे मच्छीमार खाते व सागरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कर्नाटकातील तीन मच्छीमारी ट्रॉलर ताब्यात घेण्यात आले. हे ट्रॉलर बेकायदा गोव्याच्या सागरी हद्दीत प्रवेश करून मासेमारी करीत होते. या बेकायदा प्रकारासंबंधी मच्छीमार खात्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही संयुक्त कारवाई गुरुवारी करण्यात आली. या ट्रॉलरद्वारे पकडण्यात आलेली मासळीही खात्याने जप्त केली आहे.