Home बातम्या विनयभंग प्रकरणी 2 पोलिसांचे निलंबन

विनयभंग प्रकरणी 2 पोलिसांचे निलंबन

0

पाटो-पणजी येथील एका क्लबमध्ये एका महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग केल्या प्रकरणी दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना 23 जुलैच्या रात्री घडली. या प्रकरणी पीडित महिला सुरक्षारक्षकाने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस शिपाई ओंकार जाधव आणि मयूर नाईक या दोघांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले दोघेही पोलीस शिपाई उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शाखा कार्यालयात कार्यरत होते.