उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये शंकर चोडणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे अनेक जिल्हा पंचायत सदस्य इच्छुक आहेत. आता ज्येष्ठ जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी प्राधान्यक्रमाने चर्चिले जात आहे.