Home बातम्या गोव्यातही ‘भारत बंद’ला मिळाला प्रतिसाद

गोव्यातही ‘भारत बंद’ला मिळाला प्रतिसाद

0

केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये गोव्यात अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) नेतृत्वाखाली विविध कामगार संघटनांनी सहभाग घेऊन काल येथील आझाद मैदानावर कामगारांनी निदर्शने केली. या भारत बंदचा विविध क्षेत्रांवर परिणाम जाणवला.
चार कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, किमान वेतनात वाढ करावी, फार्मा कंपनीच्या कामगारांना लागू केलेला एस्मा मागे घ्यावा, कामगारांना कामाची सुरक्षा मिळवून द्यावी, रोजगार उपलब्ध करावा, 60 वर्षांवरील सर्वांना महिना 10 हजार रुपयांचे निवृत्तिवेतन द्यावे, राज्यातील खाण व्यवसायाला गती द्यावी, अशा अनेक मागण्या कामगारांनी केल्या. निदर्शने करणाऱ्यांमध्ये औद्योगिक कामगार, अंगणवाडी, कृषी क्षेत्रातील कामगारांनी सहभाग घेतला.