सर्वोच्च न्यायालयात खाणींसाठी प्रतिज्ञापत्र सादरीकरणाची मागणी

0
123

नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर राज्यातील खाण अवलंबितांनी तीन दिवसीय धरणे आंदोलनाला कालपासून प्रारंभ केला असून धरणे ११ एप्रिलपर्यंत चालणार आहे. राज्यातील बंद खाण पडलेला व्यवसाय पुन्हा त्वरीत पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आहे.

गोवा विधानसभेत खाण प्रश्‍नी संमत केलेला ठराव आणि दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्राला खाण बंदीनंतर पाठविलेल्या पत्राच्या आधार घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी धरणे आंदोलनाच्या वेळी बोलताना केली.
सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाण प्रश्‍नीबाबतची एक याचिका १५ एप्रिल रोजी सुनावणीला येण्याची शक्यता आहे. या याचिकेवरील सुनावणीची निश्‍चित तारीख येत्या दोन दिवसात कळणार आहे, असेही गावकर यांनी सांगितले.