काल शुक्रवार दि. २७ रोजी सकाळी येथील मांडवी पुलावर एका प्रवासी बसने एका स्कुटरला धडक दिल्याने या अपघातात स्कूटरचालक महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल शुक्रवारी पणजीहून म्हापशाच दिशेने जाणार्या होंडा ऍक्टिवाला (जीए ०३ एन ६६९४, रेंट अ बाईक) म्हापसा येथून येणार्या माउली शांतादुर्गा या बसने (जीए ०७ एफ ५०७७) मागून जोराने धडक दिली. त्या धडकेमुळे स्कुटरवर बसलेली महिला स्नेहल दाभाळे (नागपूर, २८) खाली फेकली गेली व त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात सकाळी १०.५८ वाजता घडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला असून नंतर तो तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. बसचालक दामोदर गावस यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.