‘जीबीए’ अध्यक्षपदी ठाकूर बिनविरोध

0
126

एकदा नरहर ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. २०२०-२४ या चार वर्षांसाठी ते अध्यक्ष असतील. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ त्यांचाच एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. असोसिएशनच्या इतर सर्व पदांसाठीची निवडही बिनविरोध झाली. संदीप हेबळे सचिव म्हणून तर सर्फराज शेख खजिनदार म्हणून कायम राहिले आहेत.

अनिल पैंगीणकर, गौरीश धांेंड, पीटर तेलीस व संदीप खांडेपारकर हे चार उपाध्यक्ष असतील. वामन फळारी व लुसियानो सुआरिस ही दुकली सहसचिव म्हणून काम पाहणार आहे. आग्नेल दा कुन्हा, डार्विन बार्रेटो, दीपक मयेकर, नीलेश नायक, पराग चव्हाण, संजय भोेबे व वेन फर्नांडिस हे सात सदस्य असतील.

निवड झालेल्या सर्वांनी निर्वाचन अधिकारी मनोज पाटील (माजी अध्यक्ष, रोटरी पणजी) यांना अर्ज दिले होते. १६ रोजी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांच्या निवडीसंबंधी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. डार्विन बार्रेटो, दीपक मयेकर, नीलेश नायक व संजय भोबे हे या कार्यकारिणीतील नवीन चेहरे आहेत.