येथील नागरी आरोग्य केंद्राच्या कक्षेत काल आणखी ७ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून राजधानीतील रुग्णसंख्या ८५ झाली आहे. दरम्यान, आल्तिनो, पणजी येथील कोरोना रुग्णांचे निधन झालेल्या भागातील सुमारे ११२ नागरिकांचे स्वॅब कोविड चाचणीसाठी काल घेण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
आल्तिनो येथील कोरोना रुग्णाचे निधन झालेल्या भाग सील करण्यात आला आहे. त्या परिसरात सुमारे ३० घरे आहेत. स्थानिक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे, असेही महापौरांनी सांगितले.
पर्वरीत १५ नवे रुग्ण
पर्वरी परिसरात नवीन १५, शिवोलीत ६, कोलवाळ ५, कांदोळी परिसरात १०, म्हापसा १, पेडणे १०, वाळपई ९ तर साखळी भागात ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मडगावात नवे २२ रुग्ण
मडगाव येथे नवीन २२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १३६ झाली आहे. वास्को येथे १०, फोंड्यात ११ व शिरोडा येथे ८ नवीन रुग्ण सापडले आहेत.