इंग्लंड संघात बदल नाही

0
146

>> पाकविरुद्ध खेळणार ५ ऑगस्टपासून कसोटी मालिका

इंग्लंडने नुकतीच झालेली वेस्ट इंडीजविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. आता ते पाकिस्तानविरुद्ध ५ ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळणार आहेत. मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने कोणताही बदल न करताना विंडीजविरुद्ध खेळविण्यात आलेला संघच कायम ठेवला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जैव-सुरक्षित वातावरणात बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या ऐतिहासिक कसोटी कसोटी मालिकेत इंग्लंडला पहिल्या लढतीत विंडीजकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करताना दुसरी व तिसरी लढत जिंकत मालिका खिशात घातली.

त्यामुळे पाकिस्ताविरुद्धच्या मालिकेसाठीही १४ सदस्यीय संघात इंग्लंडने कोणतेही बदल केलेले नाहीत. जेम्स ब्रेसी, बेन फॉक्स, जॅक लीच आणि डॅन लॉरेन्स यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी ५ ऑगस्टपासून मँचेस्टरमध्ये खेळविली जाणार आहे. त्यानंतर १३ ते १७ ऑगस्टपर्यंत दुसरी तर २१ ते २५ ऑगस्टपर्यंत तिसरी कसोटी होईल. या दोन्ही लढती साऊथम्टनमध्ये खेळविल्या जातील. सर्व लढती जैव-सुरक्षित वातावरणात बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीतच होतील.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी घोषित करण्यात आलेला इंग्लंडचा संघ पुढीलप्रमाणे ः जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, ओली पोप, डोम सिब्ली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुर्रन, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.