भविष्यात विधानसभेचे कामकाज ऑनलाईन ः सभापती पाटणेकर

0
126

विधानसभेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत आगामी काळात गरज भासल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रतिपादन सभापती राजेश पाटणेकर यांनी एक दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप करताना काल केले आहे. आमदार लुईझीन फालेरो यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने अधिवेशनाची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. परंतु, देशभरात विधानसभांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने कुठेच घेण्यात न आल्याने निवेदनावर निर्णय घेतला नसल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.

अधिवेशनात अर्थसंकल्प, अनुदानित पुरवणी मागण्या, ११ विधेयकांना मान्यता देण्यात आली आहे. ४९ तारांकित आणि १३८ अतारांकित प्रश्‍न विचारात घेण्यात आले. माजी मंत्री सुरेश आमोणकर, माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, माजी मंत्री अच्य्ुत उसगावकर, मध्यप्रदेशचे माजी राज्यपाल लालजी टंडन, माजी राज्यपाल वेदप्रकाश मारवा यांच्यासह एकूण १५ जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली.