गोवा विधानसभेच्या येत्या सोमवार दि. २७ जुलै २०२० रोजी होणार्या एकदिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर खास मार्गदर्शक सूचना काल जारी करण्यात आल्या आहेत.
या अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या आवारात चार वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मंत्र्यांना २ वैयक्तिक कर्मचारी आणि आमदारांना १ वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
अधिवेशनात कामकाज असलेल्या खात्याच्या संबंधित अधिकार्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सरकारी खात्यांनी केवळ दोन अधिकार्यांची अधिवेशनासाठी नियुक्ती करावी. सरकारी अधिकार्यांनी कामकाजाच्या वेळेच्या १५ मिनिटे अगोदर उपस्थित रहावे.
विधानसभेच्या आवारात मास्क परिधान न करणार्या सरकारी अधिकारी किंवा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. अधिवेशनाच्या काळात विधानसभेच्या आवारात सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. या अधिवेशनासाठी जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणार्याला विधानसभेच्या आवारातून बाहेर काढण्यात येणार आहे, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
२७ रोजी पणजी, पर्वरीत
जमावबंदीचा आदेश
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी २७ जुलै २०२० रोजी होणार्या एक दिवसीय विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पणजी आणि पर्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. पर्वरी येथील विधानसभा आवाराच्या ५०० मीटरच्या क्षेत्रात आणि पणजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोर्चा, सभा, जमावबंदी, धरणे आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोर्चा, धरणे आंदोलन करणार्यांनी जिल्हा पोलीस अधिकार्याकडून आवश्यक परवानगी घेतली पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.