राज्यात संततधार पाऊस सुरूच असून मागील चोवीस तासांत ३.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण गोव्याला पावसाने झोडपून काढले असून काणकोण येथे ६.०८ इंच पावसाची नोंद झाली. राज्याच्या किनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात मागील ४८ तासांत ७ इंच पाऊस कोसळला आहे. मागील चोवीस तासात दाबोळी येथे ५ इंच, मुरगाव येथे ३.९८ इंच, केपे येथे ४.१७ इंच, सांगे येथे २.६७ , फोंडा येथे १.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पणजी येथे ३.८२ इंच, ओल्ड गोवा येथे २.७१ इंच, साखळी येथे २.७१ इंच, पेडणे येथ १.१७ इंच, म्हापसा येथे १.५३ इंच पावसाची नोंद झाली आहे.