श्रीराम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला

0
142

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरत असून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची या संदर्भात बैठक झाली. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पत्र देखील पाठवण्यात आले आहे. भूमिपूजन कधी करावयाचे हे मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून सूचित करण्यात येणार आहे. मूळ आराखड्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.