>> ऍक्टिव्ह रुग्ण १२५९, कोरोनामुक्त ६७
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी आत्तापर्यंतचे सर्वाधिक १९८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १२५९ वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासात कोरोना पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली नाही. तर, कोरोना पॉझिटिव्ह ६७ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
चिंबल, कळंगुट, कासावलीत आयसोलेटेड रुग्ण
कळंगुट येथे १ आयसोलेटेड रुग्ण आढळला आहे. कारावली येथे १ आयसोलेटेड रुग्ण आढळला आहे. चिंबल परिसरात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून गवळेभाट चिंबल येथे १ आयसोलेटेड रुग्ण आढळळाआहे. ताळगाव येथेही १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आला आहे.
कोठंबी येथे ६, आर्लेम – मडगावात २, दोनापावल येथे २ रुग्ण तर नुवे येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले आहे.
चिंबल, इंदिरानगरात नवीन २५ रुग्ण
चिंबल येथे नवीन २० रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ९३ झाली आहे. इंदिरानगर चिंबल येथे नवीन ५ रुग्ण सापडले. खारीवाडा येथे ३२, नवेवाडेत १५, बायणा १२, सडा ७ तर जुवारीनगर येथे नवीन ११ रुग्ण आढळले.
मांगूर लिंकमध्ये नवीन १०२ रुग्ण
मांगूर लिंकमध्ये १०२ रुग्णांची वाढ झाली असून मांगूर हिलमध्ये नवीन १ रुग्ण आढळून आला आहे.
कुडतरी, मडगावात नवीन रुग्ण
कुडतरीत ३, मडगावात ३, केपेत व नावेलीत प्रत्येकी १ नवीन रुग्ण सापडला. फोंड्यात ८ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४९ झाली आहे. उसगाव व शिरोड्यात १ तर मडकईत ३ रुग्ण आढळले आहेत.
मंडूर येथे नवीन ५ रुग्ण आढळले आहेत. करासवाडा येथे नवीन ७ रुग्ण आढळले आहेत. तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.