म्हादईप्रश्‍नी सुनावणी लांबणीवर ः मुख्यमंत्री

0
157

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात म्हादईच्या प्रश्‍नावरून जो तंटा चालू आहे त्यावर बुधवारी (काला) होऊ घातलेली व्हर्च्युअल सुनावणी गोवा सरकारच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

म्हादईचा प्रश्‍न हा गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे ही सुनावणी या खटल्यातील सर्व पक्ष प्रत्यक्ष न्यायालयात हजर असतानाच घेण्यात यावी, अशी आम्ही न्यायालयाकडे मागणी केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य केल्याचे सावंत म्हणाले. आता येत्या २४ ऑगस्ट रोजी न्यायालय पुढील तारीख कोविड आपत्तीमुळे निर्माण झालेली स्थिती कधी बदलते त्यानुसार देणार असल्याचे सावंत यानी स्पष्ट केले.