कोरोना महामारीच्या संक्रमणानंतर सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेद्वारे काल बुधवारपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झालेले आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी द्रुतगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधीची अपेक्षा होती. परंतु सामन्याच्या आदल्या रात्री त्याला प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने अंतिम अकरातून वगळल्याचे समजल्याने ब्रॉड संतप्त झाला आहे.
ब्रॉडने संघातून असा आकस्मिक वगळण्याचा निर्णय न समजण्या पलिकडचा असल्याचे म्हटले आहे. त्याच प्रमाणे त्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांना आपल्या भवितव्याबद्दलही स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. काल तिसर्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ब्रॉडने स्काय स्पोर्ट्शी आपल्या भावना व्यक्त केल्या. या निर्णयामुळे मी वैतागलो आहे व चिडलो ही.
हे समजणे कठीण आहे. मला वाटते मी गेल्या काही वर्षांत मी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, त्यामुळे मला मला संधी मिळायला हवी होती. मी ऍशेससाठी संघात होतो आणि मी दक्षिण आफ्रिकेलाही गेला आणि जिंकलो, असे ब्रॉडने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. ब्रॉडने इंग्लंडकडून कसोटीत आत्तापर्यंत ४८५ बळी मिळविलेले आहेत. गेल्या दक्षिण आफ्रिका दौर्यात कसोटी मालिकेत सर्वाधिक १४ विकेट्स घेतले होते. तसेच त्याने २०१९ च्या ऍशेस मालिकेत २३ विकेट्स घेतल्या होत्या.