बायर्न म्युनिकने जिंकला जर्मन करंडक

0
133

बायर्न म्युनिकने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर जर्मन लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. त्यांचे हे स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी २० वे विजेतेपद ठरले.

बायर्न म्युनिकने अंतिम सामन्यात दमदार खेळ करताना बायर लेव्हरक्युसेन संघाला ४-२ अशी धूळ चारत स्पर्धेतील हे २०वे जेतेपद निश्‍चित केले. रॉबर्ट लेवानडोस्कीने विजयात मोलाचा वाटा उचलताना २ गोल केले. तर त्याला चांगली साथ देताना डेव्हिड अल्बा आणि सर्जी नाब्री यांनी प्रत्येकी एक गोल केला. आता ऑगस्टमध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धा होत असून त्यातही विजेतेपद मिळवून यंदाच्या मोसमात विजेतेपदांची हॅट्‌ट्रिक करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.