राज्यातील पोलीस खात्यातील आत्तापर्यंत ४५ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ जणांवर कोविड इस्पितळ, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ९ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत.
दक्षिण गोव्यातील ३२ पोलीस कर्मचार्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. उत्तर गोव्यात एका पोलिसाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तसेच, पोलीस विशेष विभागाने ३, एटीएस विभागाचा १, एससीआरबी विभाग २, दक्षता खात्याच्या एसीबी विभाग १ आणि आयआरबीच्या ५ जणांचा कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये समावेश आहे. फोंड्यातील पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची जास्त बाधा झाली आहे.
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ४५ जणांमध्ये १ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, २ साहाय्यक उपनिरीक्षक, ५ हवालदार, महिला हवालदार १, २२ कॉन्स्टेबल, २ महिला कॉन्स्टेबल, २ वाहन चालक, ५ होमगार्ड, १ महिला होम गार्ड यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंटेनमेंट झोनमध्ये काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना घरी न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. या पोलीस कर्मचार्यांना राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.
एक पोलीस कामावर हजर
कोरोना विषाणू बाधित बरा झालेला एक पोलीस कर्मचारी मुरगाव येथे ड्युटीवर काल रुजू झाला आहे.
अग्निशमन जवानांनाही कोरोना
अग्निशमन दलाचे जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येत आहे. पणजी येथील मुख्यालयातील ४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.