कुशल मेंडीसची जामिनावर सुटका

0
113

पानादुरा शहरात अतिवेगाने गाडी चालवताना एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अटक करण्यात आलेला श्रीलंकन क्रिकेट संघाचा नियमित सदस्य कुशल मेंडीसची काल न्यायालयाने जामिनावर सुटका केली.कुशल हा श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्याला सायकलवरून जाणार्‍या एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आपल्या कारखाली चिरडल्याने कोलंबो पोलिसांनी रविवारी अटक केली होती. कुशलच्या गाडीखाली चिरडला गेल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीस तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले होते.

पोलीस तपासात कुशल हा दारूच्या नशेत गाडी चालवत नसल्याचे आढळून आले. पांडुराच्या कोलंबो उपनगरातील दंडाधिकारी न्यायालयात त्याला दोन हमीदार व प्रत्येकी १० लाख श्रीलंकन रुपये या अटीवर जामिनावर मुक्त केले.