कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती : राणे

0
122

 

राज्यातील कोरोना नियंत्रणाचे कार्य गतिमान करण्यासाठी नवीन आरोग्य कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली जाणार आहे. त्या कर्मचार्‍यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्रात नियुक्त केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

या आरोग्य कर्मचार्‍यांच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. राज्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या अन्नसेवेमध्ये सुसूत्रता आणण्यावर भर दिला जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांकडून विविध भागात चाचणीच्या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे, असेही आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.