पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती दिली व त्यावर चर्चा केली. पंतप्रधान नुकतेच लडाख दौर्यावरून परतले आहेत. लडाख येथे जवानांची भेट घेऊन त्यांनी त्यांना धीर दिला. त्यांचे मनोबल वाढविले. सीमावादाच्या मुद्यावरून भारत व चीन दरम्यान सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तान सीमेवर घुसखोरी वाढली आहे. या गोष्टींसह देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.