>> लागोपाठ दुसर्या दिवशीही कोरोनाचा कहर
>> विद्यमान रुग्णसंख्या ८००; राज्यात आणखी दोन मृत्यू
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून नवीन ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ८०० वर पोहोचली आहे. दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे नवीन २१ रुग्ण आढळले आहे. करंजाळे, उसगाव, पेडणे, ताळगाव, नुवे, बेतकी, आगशी येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील ३८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांचा आकडा दीड हजारांवर पोहोचला आहे. आत्तापर्यंत १५७६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यातील ७७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागातील एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
बाळ्ळीत २१ रुग्ण
दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. केपे येथे १२ रुग्ण, आंबेमळ भागात २४ रुग्ण आढळले आहेत.
करंजाळे, ताळगावात आयसोलेटेड रुग्ण
करंजाळे, ताळगाव येथे प्रत्येक १ आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी कामराभाट करंजाळे येथे २ रुग्ण आढळून आले होते.
उसगाव, बेतकी, फोंड्यात नवीन रुग्ण
उसगाव, बेतकी येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उसगावात २, बेतकी येथे १ रुग्ण आढळून आला आहे. फोंड्यात आणखी ३ पोलीस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. फोंड्यातील रुग्णांची संख्या ८ झाली आहे.
पेडणे, नुवे, आगशी येथे नवीन रुग्ण
पेडणे, नुवे, आगशी येथे प्रत्येक १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गोवा वेल्हा, पिलार येथेही रुग्ण आढळून आलेले आहेत.
गंगानगर म्हापशात नवीन ७ रुग्ण
गंगानगर म्हापसा येथे नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गंगानगरातील रुग्णांची संख्या १३ झाली आहे.
साखळीत नवीन ९ रुग्ण
साखळी येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून साखळीतील रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. वाळपई येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
चिंबल, मडगावात नवे रुग्ण
इंदिरानगर चिंबल येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून या भागातील रुग्णांची संख्या १४ झाली आहे. मडगाव येथे आणखी ६ रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या १५ झाली आहे.
बायणा, सडा, खारीवाड्यात नवे रुग्ण
बायणा येथे नवीन १२ रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या ६६ वर पोहोचली आहे. खारीवाडा येथे नवीन ६ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ३० झाली आहे. सडा येथे नवीन २ रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नवेवाडे येथे नवीन २ रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या ३९ झाली आहे. जुवारीनगरात नवीन ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ८४ झाली आहे. मांगूर हिलच्या बाहेर वास्कोत २५८ रुग्ण आढळले आहेत.
मांगूरात नवीन ५, मांगूर लिंकमध्ये १७ रुग्ण
मांगूर हिलमध्ये नवीन ५ रुग्ण आढळले आहेत. मांगूर हिलातील रुग्णांची संख्या २४५ झाली आहेत. मांगूर लिंकमध्ये नवीन १७ रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या २३८ झाली आहे.
बोमडामळ कंटेनमेंट झोन
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी फातर्पा ग्रामपंचायत क्षेत्रातील बोमडामळ प्रभाग क्रमांक २ चा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून प्रभाग २ मधील राहिलेला भाग, गोगेचा सभोवतालचा भाग, भोलो, आंबेमळ आणि होर्ना भाग बफर झोन म्हणून घोषित केला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी मोर्ले पंचायत क्षेत्रातील घोडेमळ हा कंटेनमेंट झोन, तसेच देऊळवाडा आणि कासरवाडा हे बफर झोन मागे घेणारा आदेश जारी केला आहे.
कोरोनाचे सहा बळी
मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेचा तर खारीवाडा, वास्कोतील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे गोव्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ झाली आहे.
डिचोली तालुक्यात ५४ रुग्ण
डिचोली तालुक्यात कोविडच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून काल साखळीत ११ नवे रुग्ण सापडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या ५४ झाली आहे. साखळी इस्पितळातील एक परिचारिका पॉझिटिव्ह निघाली आहे.
वझरीत ३ बाधित
पेडणे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून वझरी गावात तीन रुग्ण सापडले आहेत. देऊळवाडा वझरी येथील तर याच वाड्यावरील पणजी येथे अग्निशामक केंद्रात कामाला असलेल्या जवानाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.