पावसाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे

0
181

>> सरकारसह विरोधी पक्षाची मान्यता

सभापती राजेश पाटणेकर यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी केवळ एक दिवस घेण्यावर सर्वांनुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे हे अधिवेशन आता २७ जुलै रोजी एकच दिवस होणार आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला. बैठकीला हजर असलेले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते चर्चिल आलेमांव यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, आजच्या सभापतींनी बोलावलेल्या अधिवेशनासंदर्भातील बैठकीत हे अधिवेशन एकच दिवस घेण्याचा सर्वांनुमते निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, दिगंबर कामत यांनी सांगितले की, एक दिवस अधिवेशनाच्या प्रस्तावाला आम्ही सर्वांनी प्रस्तावाला होकार दिला. मात्र अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर करण्यापेक्षा तीन महिन्यांचे लेखानुदान संमत करावे अशी सूचना आपण केल्याचे कामत यांनी सांगितले.