येत्या दि. १८ जुलैपासून सुरू होणार्या नीट आणि जेईई परीक्षा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. कोरोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई ऍडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.