चित्रपट नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

0
206

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (७२) यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्या अनेक दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत होत्या. दि. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. याआधी त्यांची केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘देवदास’मधील ‘डोला रे डोला’, माधुरी दीक्षितच्या ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन’ आणि २००७ मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ मधील ‘ये इश्क हाए’ या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.